पत्रकारांसाठी दिलासा! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

पत्रकारांसाठी दिलासा! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

📝 महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :- कामगार दिनाच्या निमित्ताने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया आणि डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, ६ मे २०२६ रोजी पार पडणार आहे.

हे उपक्रम व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, पत्रकारांसाठी ही एक उपयुक्त आरोग्यसेवा ठरणार आहे. शिबिराची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० अशी असून, स्थळ नूर हॉस्पिटल, बायजीपुरा, गल्ली क्रमांक २६ येथे निश्चित करण्यात आले आहे.

पत्रकारांचे काम सतत धावपळीचे आणि तणावपूर्ण असते. दिवसभर घटनास्थळी फिरून माहिती गोळा करणे आणि नंतर संगणकावर काम करताना डोळ्यांवर मोठा ताण येतो. याच पार्श्वभूमीवर या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची सखोल तपासणी केली जाणार असून, आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याचाही लाभ सहभागी नागरिकांना मिळणार आहे.

या उपक्रमाबाबत प्रदेशाध्यक्ष अब्दुल कय्यूम यांनी सांगितले की, “पत्रकार हे समाजाचे डोळे आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात येत आहे.”

या उपक्रमासाठी परवेज खान (राष्ट्रीय संघटक संस्थापक) आणि डॉ. शेख शकील (जिल्हाध्यक्ष) यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. आयोजकांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

📞 संपर्क:

अब्दुल कय्यूम – ९१५८८४७१११

डॉ. शेख शकील – ९३२६५६७९९९

“आरोग्यदायी दृष्टीसाठी एक पाऊल पुढे – ही संधी पत्रकारांनी नक्कीच गमावू नये!”