नाले सफाई तत्काळ सुरू करा* *मा.सभापती यांचे आदेश

नाले सफाई तत्काळ सुरू करा* *मा.सभापती यांचे आदेश
नाले सफाई तत्काळ सुरू करा* *मा.सभापती यांचे आदेश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि.१० :- झोन क्रं.०५ एन ०९ येथील नाले सफाई तत्काळ सुरू करण्यात यावी असे आदेश आज स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिले.

   पावसाळा सुरू झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी वाढू नये,कोणतीही अडचण निर्माण होऊ नये या करिता नाले सफाई करणे अत्यंत आवश्यक आहे.या करिता कोणतीही दिरंगाई न करता नाले सफाई करा असे आदेश आज त्यांनी नाले सफाई पाहणी वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी त्यांचे समवेत मा.नगरसेवक श्री.महेश माळवतकर,उप सभापती महिला व बाल कल्याण विभाग ज्योती जैन,नगरसेवक जीवकपाल हिवराळे व सहायक आयुक्त प्राजक्ता वंजारी, प्र.उप अभियंता श्वेता चोपडे ,कर्मचारी यांची उपस्थिती होती.