नगरसेवक अजहर पठाण यांचा कामाचा धडाका; हर्सुल जामा मस्जिद चौकात तात्काळ सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ५ :- प्रभाग क्र. १ हर्सुल परिसरातील जामा मस्जिद चौक, जळगाव रोड हा अतिशय वर्दळीचा भाग असून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक अजहर पठाण यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन चौकात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासूनच काम सुरू करण्याचे आश्वासन नगरसेवक पठाण यांना दिले आहे.
नगरसेवक पठाण यांनी सांगितले की, “जामा मस्जिद चौक परिसरात व्यापारी आस्थापना, शाळा, धार्मिक स्थळे तसेच सार्वजनिक वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यंत गरजेचे आहे.”
सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळण्यास मोठा हातभार लागणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तात्काळ कार्यवाही करून प्रभाग क्र. १ हर्सुल येथील जामा मस्जिद जवळील जळगाव रोड चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी ठाम मागणी नगरसेवक अजहर पठाण यांनी केली आहे.
जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर पाऊल उचलत नगरसेवक अजहर पठाण यांनी पुन्हा एकदा विकासकामांचा धडाका कायम ठेवला आहे.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र वाणी सोबत राहा!