दुवा फाउंडेशनतर्फे ‘मुफ्त लेडीज टेलरिंग व फॅशन डिझायनिंग कोर्स’, उपक्रमाला १० वर्षे पूर्ण

दुवा फाउंडेशनतर्फे ‘मुफ्त लेडीज टेलरिंग व फॅशन डिझायनिंग कोर्स’, उपक्रमाला १० वर्षे पूर्ण
दुवा फाउंडेशनतर्फे ‘मुफ्त लेडीज टेलरिंग व फॅशन डिझायनिंग कोर्स’, उपक्रमाला १० वर्षे पूर्ण

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :- मा. खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची पत्नी श्रीमती रूमी फातेमा यांच्या दुवा फाउंडेशनतर्फे होनहार मुलींसाठी मोफत लेडीज टेलरिंग व फॅशन डिझायनिंग कोर्स आयोजित करण्यात आला आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला यंदा १० वर्षे पूर्ण होत आहेत.

या कोर्ससाठी नोंदणीची सोय ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आली असून, दररोज सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. इच्छुकांनी दुवा फाउंडेशन, कलेक्टर ऑफिसजवळ, औरंगाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. नोंदणीसाठी दोन पासपोर्ट साईज फोटो व आधारकार्डची छायांकित प्रत आवश्यक आहे.

दरम्यान, ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता रशीदपुरा येथील पाकिझा फंक्शन हॉलमध्ये लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी मागील बॅचमधील विद्यार्थिनींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे शेकडो मुलींना स्वावलंबनाचा मार्ग मिळाला असून, त्यांचा आत्मविश्वास उंचावल्याचे दुवा फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

👉 महिलांच्या प्रगतीसाठी आणि स्वावलंबनासाठी दुवा फाउंडेशनचा हा उपक्रम मोलाचा ठरत आहे.