दडपशाहीला घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी – भाजपला मतदानाचे आवाहन : चंद्रशेखर बावनकुळे

दडपशाहीला घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी – भाजपला मतदानाचे आवाहन : चंद्रशेखर बावनकुळे
दडपशाहीला घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी – भाजपला मतदानाचे आवाहन : चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र वाणी 

अंभई, दि. ४ :- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या १२४ हून अधिक योजना गावागावात राबवण्याची संधी मिळत आहे. मतदारांनी या संधीचा योग्य उपयोग करून भाजपच्या उमेदवारांना मतदानरूपी पाठबळ द्यावे, असे आवाहन महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

येणाऱ्या ०७ फेब्रुवारी रोजी ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे सांगत त्यांनी पुढील पाच वर्षे विकासाला गती देण्याचा विश्वास मतदारांना दिला.

या भव्य जाहीर सभेस मतदार बंधू-भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षवेधी ठरली.

सभेच्या मंचावर राज्याचे मंत्री मा. अतुल सावे, खासदार भागवत कराड, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सुरेश बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच यावेळी अंभई, उंडणगाव, घाटनांद्रा गटातील उमेदवार, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासासाठी कमळाला साथ द्या, ग्रामीण भागाला नवी दिशा मिळेल!