टिळक नगर येथे ‘देवगिरी महानंद देवांश मिल्क प्रॉडक्ट्स’ दालनाचे थाटात उद्घाटन! नारायण पाटील बडक यांच्या नव्या व्यावसायिक उपक्रमाला मान्यवरांच्या शुभेच्छा

सिल्लोड दि ५ :- टिळक नगर येथे माजी पंचायत समिती सदस्य श्री. नारायण पाटील बडक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘देवगिरी महानंद देवांश मिल्क प्रॉडक्ट्स’ या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे तालुकाध्यक्ष प्रा. राहुल कुमार ताठे यांनी उपस्थिती लावून नारायण पाटील बडक यांचे अभिनंदन केले. तसेच नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि व्यवसायवृद्धीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते श्री. सुरेश पाटील बनकर, माजी सभापती श्री. ज्ञानेश्वर पाटील तायडे, पंचायत समिती सदस्य श्री. सुनील पाटील मिरकर, धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश मिरकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

नारायण पाटील बडक यांनी नव्या व्यवसायाच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रात एक नवे पाऊल टाकले आहे. त्यांच्या या उपक्रमाला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळावा, व्यवसायाची उत्तरोत्तर भरभराट व्हावी आणि विश्वासार्हतेच्या बळावर त्यांनी यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा सदिच्छा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित