गॅस टंचाईने संभाजीनगर हैराण; काळाबाजाराविरोधात शिवसेनेचा एल्गार!

गॅस टंचाईने संभाजीनगर हैराण; काळाबाजाराविरोधात शिवसेनेचा एल्गार!
गॅस टंचाईने संभाजीनगर हैराण; काळाबाजाराविरोधात शिवसेनेचा एल्गार!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २७ :- शहरात घरगुती गॅसच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, दुसरीकडे गॅसचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याने सर्वसामान्यांची अक्षरशः लूट सुरू आहे. या गंभीर परिस्थितीविरोधात शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून, शहरात जोरदार आंदोलन छेडण्यात आले.

गॅस मिळत नसल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर काही ठिकाणी अधिक दराने सिलिंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.

यावेळी प्रशासनाला इशारा देत, “जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

या आंदोलनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते, ज्यामध्ये शिवसेना नेते अंबादास दानवे, सुभाष पाटील, विजयराव साळवे, संतोष खेंडके, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, प्रमोद ठेंगडे, गिरीश चपळगावकर, सुनिता आऊलवार, आशा दातार, सुकन्या भोसले, अरुणा भाटी, मीरा देशपांडे आणि रेणुका जोशी यांचा समावेश होता.

 “गॅससाठी जनता त्रस्त… प्रशासनाने आता जागं व्हायलाच हवं, अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष आणखी तीव्र होणार!”