गरिबांच्या घरावर बडगा, पण पुनर्वसन कुठे? मनपाच्या अमानुष कारवाईविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचा एल्गार
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) २४ जून :– संजयनगर-मुकुंदवाडी परिसरातील शेकडो गरीबांची घरं मनपाने निर्दयतेने जमीनदोस्त केली. कोणतीही पूर्वसूचना न देता, न्यायालयाचा गैरवापर करत प्रशासनाने झोपडपट्टीवर बुलडोझर चालवले. आता हेच गरीब रस्त्यावर आहेत – बेघर, असहाय!
या अमानवी व अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. “आम्ही बेघर झालो, पण अद्याप न्याय मिळालेला नाही!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांत अनेक अतिक्रमणधारक, महिला व लहान मुलेही सहभागी झाली होती. महापालिका आयुक्तांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, असा थेट आरोप आंदोलकांनी केला.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पाटील यांना निवेदन देत तातडीने पुनर्वसनाची मागणी करण्यात आली. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वंचित आघाडीकडून देण्यात आला.
प्रमुख उपस्थिती:
अमित भूईगळ, अमोल लांडगे, तय्यब जफर, सतीश गायकवाड, सतीश शिंदे, पंकज बनसोडे, संदीप जाधव, रुपचंद गाडेकर, प्रशांत बोर्डे, शाहीर मेघानंद जाधव, संकेत कांबळे, गणेश खोतकर, एस. पी. मगरे, मतीन पटेल, विजय बनकर, अमोल शिंदे, रवी साळवे, योगेश सोनवणे, बाळू दाभाडे, मंगेश देवकर, अजय गायकवाड, हरीश मोरे व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिलांचा मोठा सहभाग होता.
🔺सत्य परिस्थिती, थेट आवाज – अशीच बातमी तुम्हाला हवी आहे ना?
👉 आमच्या पोर्टलवर आणखी अपडेट्स वाचा!