औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सावंगी बाजार शाखेचे नवीन इमारतीत स्थलांतर
महाराष्ट्र वाणी न्युज
सावंगी बाजार, खुलताबाद दि १८ :- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सावंगी बाजार शाखेचे स्थलांतर सावंगी बाजार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नव्याने उभारलेल्या इमारतीत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सी.एस.सी. सेंटरचे उद्घाटनही संपन्न झाले.
हा समारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष किरणभाऊ डोणगावकर यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन किशोर नलावडे, सरपंच आप्पाराव नलावडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अँड. अनिल नलावडे, माजी सभापती अनिल पाटील श्रीखंडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास गायकवाड, माजी जि.प. सदस्य मोहन चंदवाडे, माजी सरपंच वसंतराव नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच पुंजाजी नलावडे, संदीप निकम, विलास आटुळे, आबाराव चव्हाण, साईनाथ बोडखे, पांडुरंग नलावडे, साहेबराव साळुंके, ज्ञानेश्वर नलावडे, भिकन घुले, कदीर पटेल, शाकेर पटेल, बद्रिनाथ काळे, सोमनाथ गायकवाड, सोमनाथ राठोड, बाळकृष्ण लोंढे, रऊफ पटेल, बाळकृष्ण दांडेकर, अप्पासाहेब जाधव, कय्युम पटेल तसेच सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सरपंच व बँकेचे अधिकारी यांची उपस्थिती लाभली.