अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेसची आक्रमक भूमिका – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेसची आक्रमक भूमिका – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेसची आक्रमक भूमिका – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत तातडीने मदत मिळावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

 शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

प्रति हेक्टर ₹५०,००० मदत

सरसकट कर्जमाफी

वीज बिल थकबाकी माफ

खरडून गेलेल्या शेतीला अतिरिक्त नुकसानभरपाई

ओला दुष्काळ जाहीर करावा

या मागण्यांचे निवेदन मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

🔹 आंदोलनात खासदार डॉ. कल्याणराव काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी आमदार नामदेवराव पवार, तसेच सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, शहराध्यक्ष अलताफ पटेल, प्रदेश पदाधिकारी अँड सय्यद अक्रम, डॉ सरताज पठाण, डॉ जफर खान, अशोक डोळस, जगन्नाथ काळे, संदीप बोरसे, भाऊसाहेब जगताप, अनिस पटेल, रावसाहेब नाडे, मोईन इनामदार, तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड, भास्करराव घायवट, संतोष मेटे, अँड अनिल नलावडे, गणेश शिंदे, दिलीप भोसले, राहुल सावंत, विठ्ठल कोरडे, अलीम सय्यद,अरुण शिरसाठ, जावेद पठाण, मुझफ्फर खान, सुधीर मुळे, कल्याण चव्हाण, पपुराज ठुबे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👉 शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.