अंभई ग्रामपंचायतीत कन्या सन्मान दिवस व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्र वाणी न्युज
अंभई (ता. सिल्लोड): आज दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, अंभई यांच्या तर्फे कन्या सन्मान दिवस व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात गुणवंत बालिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच छायाबाई दुतोंडे, उपसरपंच रईस देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक दामु अण्णा गव्हाणे, पोलीस पाटील दगडु मैंद, मोहसीन देशमुख, डॉ. वडोदे, ॲड. ताठे, समाधान भुईगळ सह ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार संजय कादी, अमोल नगरे, मंडळ अधिकारी, तलाठी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, वकील, अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी कन्या दिनानिमित्त महिलांना व बालिकांना विशेष मार्गदर्शन करून शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.
“कन्या हीच कुटुंबाची शान, तिचा सन्मान हेच आपलं काम!”