CCTV ने उघड केला स्कुटी चोराचा खेळ! जळगावमधून आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

CCTV ने उघड केला स्कुटी चोराचा खेळ! जळगावमधून आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
CCTV ने उघड केला स्कुटी चोराचा खेळ! जळगावमधून आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि १९ :- जवाहर कॉलनी चौकातील ममता ग्लास दुकानासमोर उभी असलेली ॲक्टिवा स्कुटी चोरी करून फरार झालेल्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी थेट जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. CCTV फुटेज, गुप्त माहिती आणि सायबर सेलच्या मदतीने ही कारवाई यशस्वी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संजय पांडुरंग नवाडे (वय ५८, व्यवसाय – बँक कर्मचारी, रा. पुष्कर अपार्टमेंट, आदिनाथनगर) यांची MH-20-HE-4599 क्रमांकाची काळ्या रंगाची ॲक्टिवा स्कुटी चोरीला गेली होती. चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३८/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच बिट मार्शल पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज तपासले. तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी चोरी करून जळगाव जिल्ह्यात पळून गेल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रत्नमाला धुळे आणि पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने १८ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विक्की उर्फ सुक्का सांडू यादव (वय ३२) असे असून तो मूळचा शिवनगर गादिया विहार परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान त्याने स्कुटी चोरीची कबुली दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वीही जळगाव शहर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धच्या चारपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

👉 CCTV मध्ये कैद झालेला चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात; आता आणखी गुन्हे उघडकीस येणार का?