हर्सूल तलाव परिसरात दामिनी पथकाचे विशेष पेट्रोलिंग; महिला सुरक्षेला प्राधान्य

हर्सूल तलाव परिसरात दामिनी पथकाचे विशेष पेट्रोलिंग; महिला सुरक्षेला प्राधान्य
हर्सूल तलाव परिसरात दामिनी पथकाचे विशेष पेट्रोलिंग; महिला सुरक्षेला प्राधान्य

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि २२ :- महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दामिनी पथकाकडून हर्सूल तलाव परिसरात विशेष पेट्रोलिंग करण्यात आले. जटवाडा रोडवरील हर्सूल तलाव परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

या पेट्रोलिंगमध्ये महिला हेडकॉन्स्टेबल कल्पना खरात, महिला अंमलदार शिता ढाकणे आणि महिला अंमलदार मोनिका दिवे यांनी सहभाग घेतला. परिसरात येणाऱ्या नागरिकांना सुरक्षिततेबाबत जागरूक करत कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

आपल्या परिसरातील घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र वाणी’सोबत जोडलेले राहा.