सिल्लोड–सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस उत्साहात; सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव

महाराष्ट्र वाणी 

 दि १ :– सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छांना उत्तर देताना आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्वांचे आभार मानले. “माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी प्रेमाने, आपुलकीने शुभेच्छा व आशीर्वाद दिले, त्या सर्व मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. फोन, संदेश, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटीतून व्यक्त झालेला आपुलकीचा भाव माझ्यासाठी प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “जनतेचा विश्वास आणि साथ हीच माझ्या सार्वजनिक आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे. हीच साथ आणि आशीर्वाद पुढेही मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.”

आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

— आपल्या विश्वासाची साथच माझी खरी ताकद!