सिल्लोडच्या नॅशनल नर्सिंग कॉलेजमध्ये शपथविधी सोहळा; आमदार अब्दुल सत्तार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि १० :- येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचालित नॅशनल नर्सिंग कॉलेजमध्ये दीपप्रज्वलन आणि शपथविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार अब्दुल सत्तार उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रुग्णसेवेतील सेवाभाव, संवेदनशीलता आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दीपप्रज्वलन करून नर्सिंग क्षेत्रातील सेवा, करुणा आणि उत्कृष्टतेच्या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. रुग्णसेवा ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नसून मानवतेची सेवा आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची काळजी संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने घ्यावी, तसेच समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले.
या सोहळ्याला सिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक नंदकिशोर सहारे, नॅशनल मेडिकल कॉलेजचे डॉ. मोहिते, नॅशनल नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या आसमा मुजावर, प्राध्यापक विनय ढेपे, प्राध्यापिका अर्चना खरात आणि अर्जुन दांडगे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.