सावित्रीबाई फुले भाजी मंडईसमोरील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; १२ शेडसह ११ हातगाड्या जप्त

औरंगपुरा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; एक लोखंडी कमानही हटविली, अतिक्रमित साहित्य फिल्टरबेड परिसरात जमा

सावित्रीबाई फुले भाजी मंडईसमोरील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; १२ शेडसह ११ हातगाड्या जप्त
सावित्रीबाई फुले भाजी मंडईसमोरील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; १२ शेडसह ११ हातगाड्या जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- शहरातील अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, औरंगपुरा येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडईसमोरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. या मोहिमेत दुकानांसमोरील १२ शेड आणि एक लोखंडी कमान निष्कासित करण्यात आली. तसेच ११ हातगाड्यांसह अन्य अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य फिल्टरबेड परिसरात जमा करण्यात आले.

मुख्य अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी उपआयुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक सुंदर खरात, रवींद्र देसाई, अशोक कदम आदी अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई केली. शहरातील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेकडून मोहीम राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित