शेतीसोबत पशुधनाचेही संरक्षण – आमदार विलास भुमरे यांनी केला दवाखान्याचा शुभारंभ
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ११ :- पिंप्री राजा ता. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार मा. संदिपान पाटील भुमरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते झाला.
शेतीसोबतच पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून पशुधनाच्या आरोग्यासाठी दर्जेदार सुविधा मिळाल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढते, असे प्रतिपादन आमदार विलास भुमरे यांनी यावेळी केले. या दवाखान्यामुळे उपचारासाठी लांब जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून वेळेत उपचार मिळाल्याने पशुधनाचे प्राण वाचवणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
दवाखान्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानासह उपचार सेवा व योग्य मार्गदर्शन थेट गावाजवळ उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार भुमरे यांनी दिली.
या प्रसंगी नागरिक, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकरी बांधवांसाठी आरोग्यदायी पाऊल – पशुधनाचे रक्षण, उत्पन्नात वाढ!