लाडकी बहिण लाभार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा! e-KYC अनिवार्य, अंतिम तारीख जाहीर

लाडकी बहिण लाभार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा! e-KYC अनिवार्य, अंतिम तारीख जाहीर

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि २९ :- राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ संदर्भात मोठी अपडेट आली आहे. लाभार्थी महिलांनी अनिवार्य e-KYC प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. पारदर्शकता आणि पात्र लाभार्थ्यांनाच योजना मिळावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आदिती तटकरे यांनी 'X' (माजी ट्विटर) वर यासंबंधी माहिती देत सांगितले की, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप e-KYC केले नाही त्यांना १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर e-KYC न केलेल्या लाभार्थ्यांचा पुढील हप्ता थांबू शकतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

e-KYC का आवश्यक?

योजनेत काही अपात्र लाभार्थ्यांनी अर्ज केल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा, फसवणूक टाळावी आणि योजना अधिक पारदर्शक व्हावी यासाठी e-KYC सक्तीचे करण्यात आले आहे.

कुठे आणि कशी कराल e-KYC? (सोपी प्रक्रिया)

लाडकी बहिण योजनेतील महिलांनी खालील पद्धतीने e-KYC पूर्ण करावी:

1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:

https://ladakibahin.maharashtra.gov.in

2. ‘e-KYC / आधार पडताळणी’ पर्याय निवडा

3. आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक टाका

4. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP भरून पडताळणी करा 

5. प्रक्रिया पूर्ण – पुष्टी संदेश मोबाईलवर मिळेल

टीप: ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया स्वतः करणे शक्य नाही त्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतात.

आदिती तटकरे यांचे आवाहन

"ज्या भगिनींची e-KYC प्रक्रिया प्रलंबित आहे त्यांनी पुढील आर्थिक लाभ अडचणीत येऊ नये म्हणून तातडीने e-KYC पूर्ण करावी," असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

 महत्वाच्या तारखा:

e-KYC सुरू: १८ सप्टेंबर २०२५

अंतिम तारीख: १८ नोव्हेंबर २०२५

👉 सरकार म्हणते – कागदपत्रे पूर्ण करा, योजना थांबणार नाही; पण वेळ हातातून निसटू देऊ नका!