रेलागावच्या परदेशी वाडीतील शेतकऱ्यांना दिलासा! १०० केव्ही क्षमतेची नवीन विद्युत डीपी कार्यान्वित; आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराला यश

सिल्लोड दि २४ :- तालुक्यातील रेलगाव येथील परदेशी वाडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची वीजपुरवठ्याची समस्या आता दूर होण्यास मदत होणार आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून येथे १०० केव्ही क्षमतेची नवीन विद्युत डीपी बसविण्यात आली आहे. या डीपीचे आज लोकार्पण करून ती कार्यान्वित करण्यात आली.

परदेशी वाडी परिसरात वीजपुरवठ्याबाबत वारंवार अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन नवीन विद्युत डीपी बसविण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे.

नवीन १०० केव्ही क्षमतेच्या डीपीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून शेतीच्या कामांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकरी आणि ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी जनतेच्या अडचणी सोडविणे आणि त्यांच्या मागण्यांना प्राधान्य देणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले.

जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.