राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचा सामाजिक उपक्रम; आरोग्य कर्मचाऱ्यांचा रोपटे देऊन सन्मान

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचा सामाजिक उपक्रम; आरोग्य कर्मचाऱ्यांचा रोपटे देऊन सन्मान
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचा सामाजिक उपक्रम; आरोग्य कर्मचाऱ्यांचा रोपटे देऊन सन्मान

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) वि १९ :- लोकसभेचे विरोधी पक्ष नेते Rahul Gandhi यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. जवाहर कॉलनी येथील महानगरपालिका आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका, आरोग्यसेवक आणि आरोग्य अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या रोपट्यांचे मोफत वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक रोपटे राहुल गांधी यांच्या नावाने संकल्पित करण्यात आले. आरोग्य क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत युवक काँग्रेसने हा अभिनव उपक्रम राबविला.

यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, माजी अध्यक्ष इब्राहीम पठाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजय डिडोरे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास औताडे, अशोक पगार, मुकेश सोनवणे, डॉ. सिकंदर शेख, मोईन कुरेशी, गणेश जाधव, मुनीर पटेल, इरफान पठाण, दीपक खणसे, सागर डिडोरे, किरण म्हस्के, रजक शेख, रामभाऊ लोखंडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाचे आयोजन शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर नागरे यांनी केले होते. कार्यक्रमानंतर महानगरपालिका आरोग्य केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर दवंगे तसेच आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवकांनी युवक काँग्रेसचे आभार व्यक्त केले.

वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय शुभेच्छांबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.