राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांचा सन्मान; नरेश जाधव यांच्या हस्ते सत्कार

पुणे (प्रतिनिधी) दि २३ :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पुणे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष नरेश इंद्रसेन जाधव यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन खेडकर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खेडकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष महेंद्र लालबिगे, दिनेश परदेशी, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा उपाध्यक्ष अब्बास खान, विधानसभा सचिव सचिन साळुंखे, आयाज शेख, उमेश परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी यापूर्वी पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेत (क्राइम ब्रँच) पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या कार्यकाळानंतर आता पुणे लष्कर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.