राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर; प्रदेशाध्यक्ष अॅड. अशोक बेदरे यांनी घेतली आढावा बैठक
राष्ट्रवादी भवनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद; जिल्हा आणि तालुकास्तरावर संघटना सक्षम करण्याबाबत चर्चा
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद दि १९ :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या लीगल सेलचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अॅड. अशोक बेदरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी भवन येथे दिनांक १८ रोजी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली.
लीगल सेलची पुनर्बांधणी करून संघटनात्मक ताकद वाढविणे, जिल्हा व तालुकास्तरावर संघटना अधिक सक्षम करणे, तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळातील लीगल सेलची कार्यपद्धती आणि संघटनात्मक वाटचाल याबाबतही उपस्थितांनी आपली मते मांडली.
यावेळी शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. राम हानवटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष इरफान शेख, विद्यार्थी शहराध्यक्ष योगेश घुगे, युवक प्रदेश सचिव आनंद मगरे, वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, रिझवान पटेल, अखलाख देशमुख, अजय गाडे, अॅड. गजानन गावंडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच अॅड. अशोक बेदरे यांचे सहकारी अॅड. सुदर्शन मंडलिक आणि अॅड. सागर मल्ले यांचीही यावेळी उपस्थिती होती.
लीगल सेलच्या माध्यमातून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कायदेशीर मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य देण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संघटनेची जिल्हा व तालुकास्तरावर मजबूत बांधणी करून लीगल सेलचे कार्य अधिक व्यापक करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित