वेदांतनगर पोलिसांची कामगिरी! ३ लाख ४० हजारांचे २१ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना केले परत

वेदांतनगर पोलिसांची कामगिरी! ३ लाख ४० हजारांचे २१ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना केले परत
वेदांतनगर पोलिसांची कामगिरी! ३ लाख ४० हजारांचे २१ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना केले परत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १३ :- शहरातील वेदांतनगर पोलिसांनी नागरिकांचे चोरीस गेलेले आणि हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले आहे. मागील पाच महिन्यांत पोलिसांनी तब्बल २१ मोबाईल शोधून हस्तगत केले असून, या मोबाईलची एकूण किंमत ३ लाख ४० हजार रुपये आहे. पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीमुळे मोबाईल हरवलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी हे मोबाईल शोधले. शहरातील विविध भागांसह महाराष्ट्रातील इतर जिल्हे तसेच परराज्यांतूनही हे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत सुपूर्द करण्यात आले. यावेळी मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक एम. के. पालवे आणि सायबर डेस्कचे पोलीस हवालदार एस. डी. होडशिळ यांनी पार पाडली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

तांत्रिक तपासाच्या मदतीने हरवलेले मोबाईल शोधून ते पुन्हा नागरिकांच्या हाती सुपूर्द करण्याच्या वेदांतनगर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र वाणी | 

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित