मनपा नारेगाव शाळेत नवनियुक्त प्रशासनाधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांचा सत्कार

मनपा नारेगाव शाळेत नवनियुक्त प्रशासनाधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांचा सत्कार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि २० :- महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार प्रशासन अधिकारी म्हणून संजीव सोनार, तसेच विस्तार अधिकारी म्हणून श्रीमती रईसा बेगम (URC-1) आणि विजय कोल्हे (URC-2) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथे मराठी व उर्दू माध्यमाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

केंद्रीय मुख्याध्यापिका तिलोत्तमा मापारी आणि मुख्याध्यापक शेख जुबेर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत शाळा व शिक्षकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार आणि प्रभावी काम करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.