मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र स्टार्टअप धोरण ते नागपूर सुतगिरणी कामगारांसाठी ५० कोटींचा दिलासा

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय  महाराष्ट्र स्टार्टअप धोरण ते नागपूर सुतगिरणी कामगारांसाठी ५० कोटींचा दिलासा

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि ५ ऑगस्ट :– राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये स्टार्टअप्ससाठी नवीन धोरण, जमीन धोरणातील सुधारणा, महामार्गाशी जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरसाठी मान्यता, तसेच कामगार, आरोग्य आणि परिवहन विभागातील जनहिताचे निर्णय घेतले गेले. प्रमुख निर्णय पुढीलप्रमाणे :

🔹 महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ जाहीर – राज्यात कौशल्य, रोजगार आणि नवउद्योजकांना चालना देण्यासाठी नवे धोरण.

🔹 वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग (भरवीर) फ्रेट कॉरिडॉर – प्रकल्पास मंजुरी, भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार.

🔹 अनुपयोगी किंवा लॅण्ड लॉक्ड शासकीय भूखंड वितरण धोरणास मान्यता – महसूल विभागाच्या प्रस्तावास मंजुरी.

🔹 एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी वापर – सुधारित धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी.

🔹 नागपूर विणकर सूतगिरणीच्या १,१२४ कामगारांना दिलासा – ५० कोटींचे सानुग्रह अनुदान मंजूर, जमिनीच्या विक्रीतून निधीची तरतूद.

🔹 पाचोरा (जळगाव) येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द – भूखंडाचा समावेश रहिवासी क्षेत्रात.

🔹 कुष्ठरुग्ण सेवा संस्थांच्या अनुदानात वाढ – दरमहा २ हजार रुपयांऐवजी ६ हजार रुपये मिळणार.

📝 जनतेच्या हिताचे निर्णय... विकासाची नवी दिशा!