भव्य तिरंगा रॅलीने दुमदुमले संभाजीनगर; राष्ट्रभक्तीचा विराट जागर

भव्य तिरंगा रॅलीने दुमदुमले संभाजीनगर; राष्ट्रभक्तीचा विराट जागर
भव्य तिरंगा रॅलीने दुमदुमले संभाजीनगर; राष्ट्रभक्तीचा विराट जागर

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे भव्य तिरंगा रॅली उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडली.

मराठवाड्यातील विविध भागांतून आलेले आमदार, खासदार, मंत्री, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक या रॅलीत सहभागी झाले. हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा आणि मनात राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन नागरिकांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या सहभागातून राष्ट्रप्रेमासोबतच संघटनशक्ती आणि एकतेचे दर्शन घडले.

तिरंगा हा देशाच्या स्वाभिमान, शौर्य, त्याग आणि अखंडतेचे प्रतीक आहे. तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प यावेळी अधिक दृढ करण्यात आला.

मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाजपा परिवाराचा झालेला भव्य सहभाग या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. नेतृत्व, संघटन आणि राष्ट्रभक्तीचा हा विराट संगम उपस्थितांमध्ये देशसेवेची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने या भव्य तिरंगा रॅलीची सांगता झाली.