"बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी! इंडलेस फाउंडेशनतर्फे 4 ऑक्टोबर रोजी महा रोजगार मेळावा"

"बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी! इंडलेस फाउंडेशनतर्फे 4 ऑक्टोबर रोजी महा रोजगार मेळावा"
"बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी! इंडलेस फाउंडेशनतर्फे 4 ऑक्टोबर रोजी महा रोजगार मेळावा"

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :-     रोजगार, आरोग्य आणि शेती या विषयांवर सातत्याने कार्यरत असलेल्या इंडलेस फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर फाउंडेशनने महा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

हा रोजगार मेळावा 4 ऑक्टोबर रोजी MIT कॉलेज, बीड बायपास रोड, औरंगाबाद येथे होणार असून दहावीपासून ते पदवीधर युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, FMCG, टेलिकॉम, हॉस्पिटॅलिटी, BPO, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, फार्मास्युटिकल, शोरूम, मॉल, लॉजीस्टीक्स आदी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. संबंधित क्षेत्रात कोर्स केलेल्या युवकांनाही या मेळाव्यात सामील होता येईल.

फाउंडेशनचे उपाध्यक्ष जाकीर पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “आजच्या परिस्थितीत अनेक युवक हाताला काम नसल्यामुळे निराश आहेत. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी समजून इंडलेस फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.” असे आवाहन केले.

👉 या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहावे, आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि रिझ्युमे सोबत आणावेत, असेही आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

 “बेरोजगारीवर मात करण्याची सुवर्णसंधी — 4 ऑक्टोबरचा रोजगार मेळावा तुमच्यासाठीच!”

दिनांक 4 ऑक्टोबर शनिवार

ठिकाण :- मंथन हॉल MIT कॉलेज कॅम्पस

वेळ :- सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत