फोन पेच्या नावाखाली मोठा फसवणूक रॅकेट उघड! तीन आरोपी जेरबंद – ४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त 💥

फोन पेच्या नावाखाली मोठा फसवणूक रॅकेट उघड! तीन आरोपी जेरबंद – ४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त 💥
फोन पेच्या नावाखाली मोठा फसवणूक रॅकेट उघड! तीन आरोपी जेरबंद – ४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त 💥

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २२ :- फोन पे द्वारे पैसे पाठवल्याचे खोटे दाखवून CO2 वेल्डिंग मशीनची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 काय आहे प्रकरण?

जवाहरनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५३/२०२६ अंतर्गत वैभव मशीनरी, मोंढानाका येथील संचालक अमोल सुरेश खाडेकर यांनी तक्रार दाखल केली होती. १९ एप्रिल रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी बनावट PhonePe अ‍ॅपवर पैसे पाठवल्याचे भासवून CO2 वेल्डिंग मशीनची फसवणूक केली होती.

👮‍♂️ अटक करण्यात आलेले आरोपी :

१) योगेश विनायक गव्हाणे (३५), कमलापूर, वाळूज

२) नितीन अनिल मुसमाडे (३३), कमलापूर, वाळूज

३) रवी सुभाष राठोड (३४), बजाजनगर, वाळूज

💰 जप्त मुद्देमाल :

पोलीसांनी आरोपींकडून ७३ हजार रुपये किंमतीच्या दोन CO2 वेल्डिंग मशीन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती स्विफ्ट कार असा एकूण ४,७३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

🔍 कसा लागला माग?

२२ एप्रिल रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार योगेश गव्हाणे याच्या YS इंटरप्रायजेस, मोरे चौक, वाळूज येथे छापा टाकण्यात आला. यावेळी वैभव मशीनरी येथून चोरी गेलेली मशीन सापडली. तसेच MIDC वाळूजमधील कोलगेट चौक परिसरातील एका हार्डवेअर दुकानातून याच पद्धतीने फसवणूक केलेली आणखी एक मशीनही जप्त करण्यात आली.

🚔 पोलीसांची कारवाई :

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले आणि सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक कदीर देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

सदर प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बलराज सुतार करत असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 ऑनलाईन व्यवहार करताना सावध रहा, कारण एक छोटी चूक मोठा तोटा ठरू शकतो!