पैठण पालथा नगरीतील वेड्या बाभळी तात्काळ काढाव्यात – इतिहासप्रेमींची मागणी

पैठण पालथा नगरीतील वेड्या बाभळी तात्काळ काढाव्यात – इतिहासप्रेमींची मागणी
पैठण पालथा नगरीतील वेड्या बाभळी तात्काळ काढाव्यात – इतिहासप्रेमींची मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

पैठण दि ११ :- दक्षिण काशी श्रीक्षेत्र पैठण येथील शालीवाहन नगरीतील भारत सरकारच्या ताब्यातील राष्ट्रीय स्थळ म्हणून घोषित केलेल्या २८ एकर परिसरात वेड्या बाभळींचा मोठ्या प्रमाणावर विळखा आहे. हा परिसर विकसित व्हावा, यासाठी इतिहासप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र मागणी केली आहे.

मा. आमदार भाऊराव थोरात, प्रमोद दौंड, विष्णू ढवळे, सागर पाटील, रमेश खडेकर, बंडेराव जोशी, अंबादास ढवळे यांसह कार्यकर्त्यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाने वेड्या बाभळी समुळ काढाव्यात, अशी भूमिका घेतली. अनेक वर्षांपासून या संदर्भात मागणी करूनही कारवाई न झाल्यामुळे आता संताप व्यक्त होत आहे. खासदार कल्याण काळे व खासदार संदीपन प. भुमरे यांनी याबाबत तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी इतिहासप्रेमी अभ्यासकांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खिस्ती व दिनेश पारीख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ११ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षण प्रशांत सोनोने यांची भेट घेऊन निवेदन दिले. नागघाट परिसरातील पालथा नगरीतील वेड्या बाभळी तात्काळ काढून परिसर विकासाला गती द्यावी, असा ठाम आग्रह शिष्टमंडळाने धरला

.