“तात्काळ मदत करा” – अल्पसंख्याक काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; ढगफुटीने नागरिक बेहाल

“तात्काळ मदत करा” – अल्पसंख्याक काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; ढगफुटीने नागरिक बेहाल

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १६ :- अतिवृष्टी व ढगफुटीच्या प्रचंड तडाख्यामुळे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार, घाटनांद्रा, केळगाव, अंभई यांसह पैठण, कन्नड व गंगापूर तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात तुंबली आहेत. घरे, शेती, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नागरिकांना राहण्यास व जेवणासाठी प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.

याबाबत अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात ढगफुटीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत पोहोचविण्याची, त्यांच्या निवारा व जेवणाची तातडीने व्यवस्था करण्याची, तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पंचनामे करून योग्य भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सिल्लोड विधानसभा प्रभारी डॉ. जफर अहमद खान, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे महासचिव इंजि. इफ्तेखार शेख, माजी सभापती अॅड. एबालसिंग गील, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रमंडवाल, तसेच शेख अथर, सय्यद फराज आबेदी, शाहिद खान, डॉ. सिकंदर शेख, डॉ. हाश्मी सैफुद्दीन, मोहसिन शेख, साजिद कुरेशी, नदीम सौदागर, सलमान खान, जसबीर सिंग सौदी, गौतम किसन नरवडे, मजाज खान, सय्यद युनूस, सलीम पटेल, इमरान शेख, जोस्पीच फ्रान्सिस मॅडम, शेख जुल्फेकार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, “नुकसानग्रस्तांना तातडीने मदत न मिळाल्यास जिल्ह्यातील नागरिकांचा संताप उसळेल.”

👉 ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा, हीच आजची गरज असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.