“डिजिटल मिडिया पत्रकारांचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन संभाजीनगरात – 14 सप्टेंबरला होणार भव्य मेळावा!”

“डिजिटल मिडियाचा इतिहास घडवणाऱ्या या पहिल्या अधिवेशनाचे साक्षीदार व्हा!”

“डिजिटल मिडिया पत्रकारांचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन संभाजीनगरात – 14 सप्टेंबरला होणार भव्य मेळावा!”

महाराष्ट्र वाणी न्युज 

संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ६ :- महाराष्ट्रातील युट्यूब चॅनेल आणि वेब पोर्टल चालविणाऱ्या पत्रकारांसाठी "डिजिटल मिडिया परिषदे"च्या वतीने राज्यव्यापी अधिवेशन येत्या 14 सप्टेंबर रोजी संभाजीनगरात आयोजित करण्यात आले आहे.

हा सोहळा क्रांती चौक परिसरातील संत एकनाथ रंगमंदिरात होणार असून, आधुनिक सुविधा आणि 800 आसन क्षमतेच्या या सभागृहात गर्दी उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

डिजिटल मिडिया परिषदेचे पदाधिकारी शरद पाबळे, गणेश मोकाशी, सुरेश नाईकवाडे, अनिल वाघमारे, बालाजी सूर्यवंशी आणि स्थानिक पदाधिकारी एस. एम. देशमुख यांनी नुकतीच सभागृहाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

या अधिवेशनात समाजाभिमुख पत्रकारिता करणाऱ्या संपादकांचा सत्कार करण्यात येणार असून, डिजिटल मिडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी देखील निवडली जाणार आहे. विशेष म्हणजे, डिजिटल पत्रकारांचे हे देशातील पहिलेच अधिवेशन ठरणार आहे.

अधिवेशनात डिजिटल मिडिया क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन, अनुभव व दिशा लाभणार असून, राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

 “डिजिटल पत्रकारांचा आवाज बुलंद करणारे हे अधिवेशन प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल,” असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

✨ डिजिटल पत्रकारांच्या इतिहासात सुवर्णपान कोरणारा हा मेळावा ठरणार – याची खात्री आयोजकांनी दिली आहे.