डिजिटल पत्रकारांसाठी आनंदाची बातमी; मिळणार सरकारी जाहिराती; मुख्यमंत्री फडणवीस यांची सकारात्मक भूमिका; डिजिटल मिडियाला जाहिरातींचा मार्ग मोकळा

डिजिटल पत्रकारांसाठी आनंदाची बातमी; मिळणार सरकारी जाहिराती; मुख्यमंत्री फडणवीस यांची सकारात्मक भूमिका; डिजिटल मिडियाला जाहिरातींचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र वाणी न्युज

मुंबई दि ४ जून :- डिजिटल मिडियाला सरकारी जाहिराती मिळाव्यात, या मागणीस अखेर यश मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने काल सर्व विभागांना डिजिटल मिडियाला जाहिराती देण्याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले. यामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासारखेच आता डिजिटल मीडियालाही सरकारी जाहिराती मिळणार आहेत.

ही ऐतिहासिक घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे डिजिटल मिडियाशी जोडलेल्या हजारो पत्रकारांना आता अधिकृत मान्यता आणि उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रात सध्या 2500 पेक्षा जास्त युट्यूब चॅनेल्स आणि डिजिटल पोर्टल्स कार्यरत असून, सुमारे 5000 हून अधिक पत्रकार या क्षेत्राशी संबंधित आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे या सर्व माध्यमांना चालना मिळणार आहे तसेच डिजिटल माध्यमाचा विस्तार आणि विश्वासार्हता यामध्ये वाढ होईल.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषद यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले आहेत. परिषद अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी सांगितले की, "डिजिटल मिडियाने आता अधिक जबाबदारीने पत्रकारिता करत जनतेचा विश्वास संपादन करावा. तसेच आता सोशल मिडियाला जाहिराती मिळू लागल्याने या माध्यमातील पत्रकारांनाही अधिस्वीकृती पत्रिका मिळायला हव्यात. त्यासाठी पुढील पाठपुरावा सुरूच राहील.