डिजिटल पत्रकारांचा पहिला राज्यस्तरीय महामेळावा १४ सप्टेंबरला”! स्वागताध्यक्ष बालाजी सूर्यवंशी”
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १० :- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषद आयोजित पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, १४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात हा ऐतिहासिक महामेळावा होणार आहे. पत्रकारांचे ज्येष्ठ नेते एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या अधिवेशनामुळे राज्यातील डिजिटल पत्रकारांना नवे व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष व स्वागताध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
सूर्यवंशी म्हणाले की, एस. एम. देशमुख यांनी तळागाळातील पत्रकारांसाठी नेहमीच संघर्ष केला आहे. पत्रकार संरक्षण कायदा, महागाई निर्देशांकानुसार पेन्शन योजना, डिजिटल पत्रकारांना मान्यता व सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला वारंवार धारेवर धरले आहे.
या अधिवेशनामुळे डिजिटल पत्रकारांची एकसंघ ओळख राज्यभर ठळकपणे समोर येणार आहे.
स्थळ : संत एकनाथ रंगमंदिर, उस्मानपुरा
🕥 वेळ : सकाळी १०.३० वाजता, १४ सप्टेंबर
या ऐतिहासिक मेळाव्यासाठी ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे, डॉ. अब्दुल कदीर, स. सो. खंडाळकर, सुनील वाघमारे, प्रकाश भगनुरे, कानीफ अन्नपूर्णे, माधव जामनिक, ब्रह्मानंद चक्करवार आदींचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील सर्व पत्रकारांना “चलो छत्रपती संभाजीनगर” या हाकेतून या महामेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
✍️ डिजिटल पत्रकारांच्या इतिहासातील हा नवा अध्याय – संपूर्ण अपडेट्स वाचत रहा महाराष्ट्र वाणी वरच!