जनसेवा युवा ड्रायव्हर फाउंडेशनचा पदाधिकारी मेळावा उत्साहात पार!नियुक्तीपत्र वाटप सोहळ्यास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांची उपस्थिती
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ११ : – जनसेवा युवा ड्रायव्हर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे पदाधिकारी मेळावा व नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम दि. ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
संघटनेचे संस्थापक व पदाधिकारी उपस्थित
कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक शोएब भैय्या शेख, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मधुताई पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष शुभम भैय्या वावरे, सोशल मीडिया प्रमुख उषाताई कदम, जिल्हाध्यक्ष उमेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किरण बोराडे यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग तांगडे पाटील
मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना—“चालक बांधवांच्या प्रश्नांवर संघटनेने ठाम भूमिका घेऊन समाजोपयोगी कार्यात नेहमी आघाडीवर राहावे,” असे प्रतिपादन केले.
नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान
मेळाव्यात नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पदाधिकाऱ्यांनी संघटना बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.
✨ “चालक बांधवांच्या हक्कासाठी आणि समाजसेवेसाठी—फाउंडेशन सदैव तत्पर!”