“जनसुरक्षा नाही, जनदडपशाही!” – काँग्रेसची संघर्ष समितीसोबत बैठक; काळा कायदा मागे घेण्याची निर्धार

“जनसुरक्षा नाही, जनदडपशाही!” – काँग्रेसची संघर्ष समितीसोबत बैठक; काळा कायदा मागे घेण्याची निर्धार
“जनसुरक्षा नाही, जनदडपशाही!” – काँग्रेसची संघर्ष समितीसोबत बैठक; काळा कायदा मागे घेण्याची निर्धार

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, दि. १८ जुलै :–. राज्यात जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता अधिक बळ मिळाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज गांधी भवन, मुंबई येथे जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, तसेच नेते धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्यासह संघर्ष समितीचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये उल्का महाजन, सुजाता गोठस्कर, चयनिका शाह, कॉ. सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, एस. के. रेगे, विजय कुलकर्णी, विवेक मॉन्टेरो, राजू कोरडे व अशोक सूर्यवंशी यांचा सहभाग होता.

बैठकीत जनसुरक्षा कायद्याला विरोध करताना ठाम भूमिका घेण्यात आली. या कायद्यामुळे लोकांचे मूलभूत अधिकार धोक्यात येतात आणि सरकारविरोधातील आवाज दाबण्याचे हे साधन बनले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. हा कायदा म्हणजे राज्यघटनेच्या चौकटीबाहेरील दडपशाही असल्याचे मत सर्व वक्त्यांनी एकमुखाने मांडले.

काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून, या ‘काळ्या’ कायद्याच्या विरोधात शांततामूलक आणि लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

"हा लढा फक्त काँग्रेसचा नाही, तर तो तरुण, विद्यार्थी, शेतकरी, कामगार व सामान्य माणसाचा आहे", असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्ष जनतेसोबत खंबीरपणे उभा असून, सरकारला संविधानिक चौकटीत उत्तर देण्यासाठी भाग पाडेल, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

🔴 ✊ लोकशाही वाचवा, संविधान वाचवा!

🔴 ✊ काळा कायदा मागे घ्या!

अधिक वाचा आणि शेवटपर्यंत जोडा – कारण ही लढाई आपल्या हक्कांची आहे!