"चड्डी बनियान गँगचा महाराष्ट्रात धुमाकूळ!"विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आक्रमक आंदोलन

"चड्डी बनियान गँगचा महाराष्ट्रात धुमाकूळ!"विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आक्रमक आंदोलन
"चड्डी बनियान गँगचा महाराष्ट्रात धुमाकूळ!"विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आक्रमक आंदोलन

महाराष्ट्र वाणी 

मुंबई दि १६ जुलै :- महाराष्ट्रात लुटीच्या घटना वाढल्याने ‘चड्डी बनियान गँग’चा थरकाप सर्वत्र पसरला आहे. या पार्श्वभूमीवर आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात आंदोलन छेडले.

राज्यात चड्डी बनियन गँग विविध कंत्राटांच्या माध्यमातून जनतेच्या पैशांवर दरोडे घालते आहे. सामान्य माणसाला मारहाण करणं, आणि धार्मिक स्वरूपाचे होमहवन करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणं, हे प्रकार सुरू आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

“पन्नास खोके एकदम ओके”, “चड्डी बनियन गँग हाय हाय”, “महाराष्ट्राला लुटणाऱ्यांचा धिक्कार असो”, अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

हे आंदोलन म्हणजे केवळ निदर्शने नसून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा पुरावा असल्याचे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे.

 राज्यातील गँगविरुद्ध कठोर कारवाई होईपर्यंत विरोधकांचा लढा सुरूच राहणार, असे संकेतही यावेळी देण्यात आले.