"घाटीत १० जणांना सरकारी नोकरी! अधिष्ठात्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप"

"घाटीत १० जणांना सरकारी नोकरी! अधिष्ठात्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप"
"घाटीत १० जणांना सरकारी नोकरी! अधिष्ठात्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप"

 महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (प्रतिनिधी): घाटी रुग्णालयातील अलीकडील साडेतीनशे कर्मचाऱ्यांच्या मेगाभरतीनंतर आता लाडपागे समिती व अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारांनाही दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (७ जुलै) घाटी रुग्णालयात एकूण १० पात्र उमेदवारांना चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले.

नियुक्तीपत्रांचे वितरण अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत घाटी रुग्णालयाच्या कार्यात प्रामाणिकपणे योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सुक्रे यांनी केले.

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती मिळाल्याबद्दल उमेदवारांनी अधिष्ठाता डॉ. सुक्रे तसेच प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी उपअधिष्ठाता डॉ. सुरेश हरबडे, डॉ. काशिनाथ गर्कळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता जोशी, प्रशासकीय अधिकारी अनिल गाडे, दिलीप गोधणे, डॉ. वैशाली उणे-लोखंडे, डॉ. सोनाली जटाळे आदी उपस्थित होते.

लाडपागे समिती अंतर्गत नियुक्त उमेदवार:

विशाल मारोती कांबळे (सफाईगार)

रोहण पदमाकर सुरडकर (सफाईगार)

मोहम्मद सुमेर कलीम शेख (सफाईगार)

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त उमेदवार:

प्रदीप प्रकाश रॉय (सफाईगार)

शेख नवीद शेख जावेद (सफाईगार)

स्वाती अमोल सरपाते (सफाईगार)

भावेश जितेंद्र चव्हाण (सफाईगार)

दुर्गा महेंद्र चंडालिया (सफाईगार)

अम्रपाली रावसाहेब ताटे (कक्षसेवक)

आरती प्रशांत येरफुले (कक्षसेवक)