गांधीजींच्या वेशभूषेत विद्यार्थ्याने वेधले लक्ष; इकरा शाहीन उर्दू स्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहात

गांधीजींच्या वेशभूषेत विद्यार्थ्याने वेधले लक्ष; इकरा शाहीन उर्दू स्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहात
गांधीजींच्या वेशभूषेत विद्यार्थ्याने वेधले लक्ष; इकरा शाहीन उर्दू स्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहात

जळगाव दि ३ :- इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांसह विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता, मानवता आणि राष्ट्रसेवेच्या विचारांची ओळख करून दिली.

कार्यक्रमात कक्षा VA मधील विद्यार्थी माज मुस्तकीम पिंजारी याने महात्मा गांधी यांची भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गांधीजींच्या वेशभूषेत विद्यार्थ्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी झलक सादर केली.

सकाळच्या सत्रात नूरजहाँ मिस यांनी महात्मा गांधी यांच्या साधेपणा, मानवतावादी दृष्टिकोन आणि सर्वधर्म समभावाच्या विचारांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समाजात प्रेम, बंधुभाव, सहिष्णुता आणि परस्पर आदराची भावना वाढीस लागण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

दुपारच्या सत्रात इफ्तेखार सर यांनी गांधीजींच्या जीवनातील त्याग, संघर्ष आणि राष्ट्रसेवेवर प्रकाश टाकला. सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालत गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच गांधीजींच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करण्याचे आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या जाणून घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य रियाझ शाह सर आणि सुपरवायझर जाकीर सर यांनी विद्यार्थी, शिक्षक व सहकार्यांचे आभार मानले. गांधी जयंतीच्या शुभेच्छा देताना त्यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि मानवतेचे मूल्य विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे, असे सांगितले.

इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार आणि सचिव एजाज अहमद मलिक यांनीही गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. नव्या पिढीपर्यंत महात्मा गांधींचे विचार आणि राष्ट्रसेवेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज