औरंगाबादच्या डॉ. अब्दुल मुकीत यांची आंतरराष्ट्रीय झेप! इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक क्षेत्रातील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फेलोशिप पूर्ण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- औरंगाबादच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी करत डॉ. अब्दुल मुकीत यांनी Interventional Neurology and Stroke या अत्यंत विशेष आणि आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील Egas Moniz International Fellowship तसेच SNIF Global Clinical Fellowship यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
ही प्रतिष्ठित फेलोशिप Baby Memorial Hospital (BMH), कोझिकोड आणि University Hospital Zurich (USZ), स्वित्झर्लंड येथे पूर्ण करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणामुळे डॉ. अब्दुल मुकीत यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वपूर्ण मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या फेलोशिपदरम्यान त्यांनी अक्यूट स्ट्रोक इंटरव्हेन्शनपासून अत्याधुनिक न्यूरो-इंटरव्हेन्शनल उपचार पद्धतींचे प्रशिक्षण घेतले. यामध्ये ब्रेन अॅन्युरिझम, ब्रेन AVM, Dural AV Fistula, CC Fistula, Venous Thrombectomy, Tumor Embolisation, Angioplasty आणि Stenting यांसारख्या गुंतागुंतीच्या उपचार पद्धतींचा समावेश आहे.
या संपूर्ण प्रशिक्षण काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन डॉ. मुकीत यांना लाभले. प्रा. शकीर हुसेन, माजी प्रमुख Neurointervention, USZ स्वित्झर्लंड, तसेच Head of Neurointervention, BMH आणि Chairman, Stroke and Neurointervention Foundation (SNIF), यांच्यासह प्रा. झोल्ट कुलचार, Head of Neurointervention, USZ Switzerland आणि प्रा. टिलमन शुबर्ट, Deputy Head of Neurointervention, USZ Switzerland यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले.
औरंगाबादच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण
या यशाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. अब्दुल मुकीत यांनी आपल्या शिक्षक, सहकारी आणि कुटुंबीयांचे आभार मानले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच ही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व वैद्यकीय वाटचाल शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
“अधिकाधिक स्ट्रोक रुग्णांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देणे आणि Interventional Neurology या क्षेत्रात योगदान देणे” हा आपला पुढील प्रयत्न असल्याचे डॉ. मुकीत यांनी सांगितले.
डॉ. अब्दुल मुकीत हे सेवानिवृत्त प्राचार्य, मौलाना आझाद ज्युनिअर कॉलेज, शेख अब्दुल लतीफ यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय क्षेत्रासह शहरवासीयांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.
औरंगाबादच्या भूमीतून आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. अब्दुल मुकीत यांचे हे यश निश्चितच शहरासाठी गौरवास्पद आहे.
अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी