“उद्धव ठाकरेंची महायुतीवर झंझावती टिका: ‘अॅनाकोंडा आता तुम्हालाच गिळणार!’”
उपमुख्यमंत्रीपद रद्द करा! – उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि ६ :- महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला ५ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे स्टाइलमध्ये सरकारवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले—
“सरकारला वर्ष झालं, पण अजूनही दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद दिलेलं नाही. हे पद तात्काळ द्या… अन्यथा उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याचा निर्णय घ्या.”
त्यांनी पुढे महायुतीतील तिन्ही पक्षांवर टोलाही लगावला.
“महा-युतीतील तीन पक्षांची नावं आणि चिन्हं वेगळी असली, तरी त्यांचा मालक एकच आहे. हे सर्व बी-टीम आहेत,” असा टोला त्यांनी हाणला.
उद्धव ठाकरे इथेच थांबले नाहीत.
पूर्वी वापरलेला शब्द आठवण करून देत ते म्हणाले—
“मी काही दिवसांपूर्वी ‘अॅनाकोंडा’ हा शब्द वापरला होता. आता त्या अॅनाकोंडाचा अनुभव महायुतीतील दोन्ही पक्षांना येत आहे. शेवटी त्यांना त्या अॅनाकोंडाने गिळल्याशिवाय राहणार नाही.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूत्रांमध्ये ताण वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
“एक वर्ष पूर्ण, पण राजकीय तापमान पुन्हा वाढलं – पुढे काय?”