✒️ महाराष्ट्र विधान परिषदेतील आक्रमक आवाजाचा कार्यकाळ संपला...

✒️ महाराष्ट्र विधान परिषदेतील आक्रमक आवाजाचा कार्यकाळ संपला...
✒️ महाराष्ट्र विधान परिषदेतील आक्रमक आवाजाचा कार्यकाळ संपला...

महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आक्रमक नेते मा. अंबादास दानवे साहेब यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे.

विरोधी पक्षनेते या भूमिकेतून त्यांनी गेल्या काही वर्षांत राज्य सरकारला सातत्याने धारेवर धरले. शेतकरी असोत वा युवा, कामगार असो वा सर्वसामान्य नागरिक – प्रत्येक वर्गाच्या प्रश्नांना त्यांनी विधिमंडळाच्या पटलावर जोमाने आवाज दिला. ग्रामीण भागातील अडचणींपासून शहरी समस्यांपर्यंत प्रत्येक मुद्यावर त्यांनी अभ्यासपूर्ण व ठाम भूमिका घेत सर्वांचे लक्ष वेधले.

त्यांच्या आक्रमक शैलीमुळे, निर्भीड वक्तव्यांमुळे आणि जनतेच्या प्रश्नांवरील ठाम भूमिकेमुळे विधान परिषदेतील वातावरण अनेकदा तापले. मात्र त्याचबरोबर या शैलीमुळे जनतेमध्ये त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.

आज विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा कार्यकाळ संपत असला तरी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर दानवे साहेबांची उपस्थिती पुढील काळात आणखी प्रभावी होईल, याचा विश्वास त्यांच्या चाहत्यांसह जनतेलाही आहे.

👉 महाराष्ट्र वाणी तर्फे मा. अंबादास दानवे साहेब यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा आवाज असाच बुलंद घुमत राहो, हीच अपेक्षा.