"१५ ऑगस्टपर्यंत संधी!" – जालना रोड, पैठण रोड आणि पडेगाव-मिटमिटा रोडवरील रहिवासी अतिक्रमणकर्त्यांसाठी मनपाचे आवाहन

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३० जून :– जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास रोड आणि पडेगाव-मिटमिटा रोडवरील सर्व्हिस रोडलगतच्या रहिवासी मालमत्तांवरील अनधिकृत बांधकामे स्वतःहून काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत दिली आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होत असून, ही संधी केवळ रहिवासी मालमत्ता धारकांसाठी आहे. या मोहिमेत व्यावसायिक बांधकामे किंवा इतर मालमत्तांचा समावेश नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. जी. श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे असलेल्या नागरिकांसाठी गुंठेवारी नियमितीकरणाची विशेष संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित रहिवाशांनी ही संधी घेऊन कायदेशीर अडचणी टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
मनपाचे स्पष्ट संकेत – वेळेत पाऊल उचला, अडचणी टाळा!
अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी जोडलेले राहा! महाराष्ट्र वाणी.com शी