सिल्लोडमध्ये शिवजयंती उत्सव समिती 2026 ची कार्यकारिणी जाहीर; आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

✍️ महाराष्ट्र वाणी

सिल्लोड (प्रतिनिधी)दि १२ :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत सिल्लोड शहर व तालुका छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती 2026 ची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.

या निवडीत अध्यक्षपदी अर्जुन पा. गाढे यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, स्वागताध्यक्षपदी राजू बाबा काळे, महासचिवपदी देविदास पालोदकर तर सचिवपदी विशाल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच कोषाध्यक्षपदी नंदकिशोर सहारे, सहस्वागताध्यक्षपदी सुदर्शन अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.

या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवजयंती उत्सव अधिक जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन व चर्चा करण्यात आली.

✨ शिवजयंतीचा उत्सव यंदा सिल्लोडमध्ये ऐतिहासिक ठरणार, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.