सासन रामापुर शाळेची इमारत धोक्यात; पावसाचे पाणी दरवर्षी वर्गखोल्यांमध्ये, व्यवस्थापनाला निवेदन

सासन रामापुर शाळेची इमारत धोक्यात; पावसाचे पाणी दरवर्षी वर्गखोल्यांमध्ये, व्यवस्थापनाला निवेदन
सासन रामापुर शाळेची इमारत धोक्यात; पावसाचे पाणी दरवर्षी वर्गखोल्यांमध्ये, व्यवस्थापनाला निवेदन

महाराष्ट्र वाणी न्युज 

सासन रामापुर (ता. दर्यापुर) दि ३ ऑगस्ट :- येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व उर्दू शाळेची दयनीय अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. विशेषतः पावसाळ्यात दरवर्षी पावसाचे पाणी थेट शाळेच्या इमारतीमध्ये शिरते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच, पण शाळेच्या इमारतीच्या पाया धोक्यात येत आहे.

या गंभीर समस्येबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी आज दि. ३ ऑगस्ट रोजी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य मुमताजभाई देशमुख आणि काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अमरावती यांनी तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर भाऊ भारसागळे यांना अधिकृत निवेदन दिले. या निवेदनात शाळेतील पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, शाळेच्या इमारतीचा बांधकाम व दर्जा तपासावा आणि शाळेच्या परिसराचे पुनर्विकासाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी ईश्वर भाऊ बुंदुले, शहर अध्यक्ष शिरभाते साहेब, ऍड. निशिकांत पाखरे, अब्दुल कलीम अब्दुल बशीर हे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनी देखील शाळेच्या परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

स्थानीय नागरिक आणि पालकवर्गाने यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण दोन्ही धोक्यात येणार आहे, अशी चिंता व्यक्त होत आहे.

– महाराष्ट्र वाणी.com 

"शाळा वाचवा, भविष्यास वाचवा!"