इकरा एच. जे. थीम कॉलेजमध्ये ‘नवीकरणीय ऊर्जा स्रोत’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

इकरा एच. जे. थीम कॉलेजमध्ये ‘नवीकरणीय ऊर्जा स्रोत’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
इकरा एच. जे. थीम कॉलेजमध्ये ‘नवीकरणीय ऊर्जा स्रोत’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र वाणी 

जळगाव दि ३० :- इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरुण, जळगाव येथील भौतिकी विभागातर्फे दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी

“नवीकरणीय ऊर्जा स्रोत : तंत्रज्ञान, आव्हाने व भविष्यकालीन संधी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुहास पाटील (डॉ. ए. जी. डी. बेंदाले कॉलेज) उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रास्ताविक डॉ. टी. ए. खान यांनी केले, तर कार्यक्रमाचे स्वागत डॉ. युसूफ पटेल यांनी केले.

कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व प्राध्यापकांमध्ये नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, सध्याची आव्हाने आणि भविष्यकालीन संधी याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. शबाना खाटीक यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊर्जा क्षेत्रातील नवे विचार आणि संधी विद्यार्थ्यांसमोर मांडणारी ही कार्यशाळा प्रेरणादायी ठरली.