"सळो की पळो करू!" – मराठा आरक्षणावरून जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा; 29 ऑगस्टला 'चलो मुंबई'ची गर्जना

“जर यावेळी आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही माघारी येणार नाही. मरण पत्करू पण विजय घेऊनच परतू,”

"सळो की पळो करू!" – मराठा आरक्षणावरून जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा; 29 ऑगस्टला 'चलो मुंबई'ची गर्जना

महाराष्ट्र वाणी न्युज 

आंतरवाली सराटी,जालना दि १३ जुलै :- मराठा आरक्षण 

मराठा समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा आता निर्णायक टप्प्याकडे वळली आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे राज्यस्तरीय बैठकीत निर्णायक घोषणा केली आहे – 29 ऑगस्टला 'चलो मुंबई'!

या बैठकीत जरांगेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “एकदा आंतरवाली सोडली, तर मागे फिरायचं नाही. आता लढायचं आणि विजय मिळवल्याशिवाय परतायचं नाही.” त्यांनी पुढे नमूद केलं की आरक्षणासाठीची ही लढाई अंतिम आणि आरपारची ठरणार आहे.

जरांगेंच्या मते, आतापर्यंत 58 लाख मराठा नागरिकांची नोंद सापडली असून त्यातील बहुतांश समाज आरक्षणाच्या श्रेणीत मोडतो. फक्त उरलेल्या 7 ते 8 टक्क्यांसाठीच आता ही निर्णायक चळवळ उभी केली जात आहे.

दरम्यान, त्यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांची भेट घेतली असून सर्वपक्षीय नेत्यांशीही थेट संपर्क साधल्याचं त्यांनी सांगितलं. "आरक्षणाची मागणी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, तर गोरगरीब मराठ्यांच्या हक्कासाठी आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.

जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रोखठोक शब्दांत इशारा दिला –

“मराठी आणि कुणबी एकच आहेत, हे मान्य करून तातडीने GR काढा. अन्यथा 29 ऑगस्टला 5 पट जास्त मराठा मुंबईत उतरणार आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास जबाबदार सरकार असेल.”

“जर यावेळी आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही माघारी येणार नाही. मरण पत्करू पण विजय घेऊनच परतू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शेवटी एकच हाक – “आता थांबायचं नाही... फक्त लढायचं!”