सरकारी धोरणावर टीका केल्यास कारवाई! कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर नवे निर्बंध लागू

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २९ जुलै :- शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारच्या धोरणांवर सोशल मीडियावर टीका करू नये, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, राज्यभरातील शासकीय, निमशासकीय, कंत्राटी, प्रतिनियुक्तीवरील तसेच सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
डिजिटल माध्यमांचा वापर वाढल्याने माहितीचा प्रसार झपाट्याने होतो. मात्र, गोपनीय कागदपत्रांचे प्रसारण, खोट्या माहितीचा प्रसार किंवा सरकारी धोरणांवर टीका केल्याने प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांवरील वर्तनात जबाबदारी पाळावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
🔹 हे आहेत महत्त्वाचे निर्बंध :
सरकारी धोरणांवर टीका करण्यास बंदी
वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाती स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश
सरकारने बंदी घातलेल्या अॅप्स किंवा संकेतस्थळांचा वापर टाळावा
गोपनीय दस्तऐवज वा सरकारी कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर करू नयेत
या नव्या अटींचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
सरकारवर मत मांडणे आता धोक्याचे ठरणार?