शिक्षक दिनानिमित्त समाजकर्मींमार्फत शिक्षकांचा सन्मान
महाराष्ट्र वाणी न्युज
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :- शिक्षक दिनानिमित्त उस्मानपुरा येथील पन्नालाल नगर माध्यमिक शाळेतील सेवा निवृत्त आदर्श शिक्षिका श्रीमती शकुंतलाबाई गंगाधर कुलकर्णी तसेच पदमपुरा येथील शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रभुलाल काका तोनगीरे यांचा त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोक बन्सवाल आणि नथुराम मेहरा यांच्या हस्ते झाला. या वेळी संतोष कुलकर्णी, सौ. रेणुका संतोष कुलकर्णी, ब्रिजलाल तोनगीरे, कंठीलाल तोनगीरे आदी मान्यवर उपस्थित होते.
✍️ महाराष्ट्र वाणी – शिक्षकांचा गौरव म्हणजे समाजाचे ऋण फेडणे!