शफिक शेख यांची अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ७ :- गारज देवगाव रंगारी येथील काँग्रेस पक्षाचे सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते शफिक शेख यांची अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्या हस्ते दिनांक 6 डिसेंबर रोजी पक्ष कार्यालय गांधी भवन येथे शफिक शेख यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्ती कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, ॲड. एक्बालसिंह गिल, जगन्नाथ काळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव गौरव जैस्वाल, ओबीसी जिल्हाध्यक्ष आतिश पितळे, NSUI चे जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे, अबीद जहागिरदार, फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष मेटे, अनिल नरवाडे, सुरेकांत गरड, खुलताबाद शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल मजीद, सत्तार शेख औरंगाबादी आदी मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाला बळकटी देण्यासाठी आणि जिल्ह्यातील संघटनात्मक कामाला अधिक वेग देण्यासाठी शफिक शेख यांची नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. नव्या जबाबदारीबद्दल शफिक शेख यांनी समाधान व्यक्त करत, पक्ष संघटन दृढ करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची ग्वाही दिली.
— महाराष्ट्र वाणीसोबत राहा, प्रत्येक स्थानिक घडामोडीची विश्वसनीय अपडेट सर्वात आधी!