‘विधान परिषद सदस्य होताच दानवेंचे दमदार स्वागत, शिवसैनिकांचा उत्साह शिगेला’

‘विधान परिषद सदस्य होताच दानवेंचे दमदार स्वागत, शिवसैनिकांचा उत्साह शिगेला’
‘विधान परिषद सदस्य होताच दानवेंचे दमदार स्वागत, शिवसैनिकांचा उत्साह शिगेला’

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे शहरात आगमन होताच शिवसैनिकांनी जल्लोषात भव्य स्वागत केले. रेल्वे स्टेशनपासून क्रांती चौकापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीने संपूर्ण शहर दणाणून गेले.

वंदे भारत एक्सप्रेसने आगमन झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. त्यानंतर फोर व्हीलर रॅलीद्वारे दानवे यांचे स्वागत करत स्टेशन, कोकणवाडी चौक, गोपाल टी, जे टॉवर आणि एसएससी बोर्ड चौक येथे पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.

“शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, तसेच “हा आवाज कुणाचा - शिवसेनेचा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थही जोरदार घोषणा देण्यात आल्या.

गुलाल उधळत, भगवे झेंडे हातात घेऊन “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. ढोल-ताशांच्या गजरात रॅली क्रांती चौकात पोहोचली.

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या भव्य स्वागत सोहळ्यात शिवसैनिकांसह नागरिक, महिला व माता-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

👉 संभाजीनगरच्या राजकीय रंगमंचावर दानवेंच्या स्वागताने नवी ऊर्जा निर्माण झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे!